नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 1, 2022

तो नवीन प्रकाश आला ..

निराशा मावळण्यासाठी ..
आशा रुजवण्यासाठी ..
तो  नवीन प्रकाश आला .
जीवनाचा सूर्योदय झाला ..

   हातात काकन होते बांधलेले ..
  त्याचेच नावाचे जणू तोरण होते लाधलेले ..
   त्याच्यामुळेच आज मी होते बहरले ..
   त्याच्यासाठीचं आज  हात होते मेहंदिने सजलेले .

लाल रंग प्रेमाचा ..
भाळी लागणार होता त्याच्या नावाचा ..
हातात हिरवा चुडा
साक्षीदार होता त्याच्या प्रेमाचा ..

        सप्तपदी चालणार होते त्याच्या सोबत आज ..
        सात जन्म साथ देण्याची वचन देणार होते त्याला आज ....
त्याच्यासाठीच तर दिवस सजला होता खास ..
त्याची माझी होणार होती एक रास ..
दुर्गा मते
©®


2 comments:

  1. खूप सुंदर रचना ✍️👌👌👌

    ReplyDelete
  2. वा अतिशय सुंदर आणि अगदी मनाला स्पर्शून जाणारी गोड अशी रचना केली नित्या डियर 😘😘😘 खुपच खास लिहिलीस गं 👌👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...