नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 10, 2022

हळूच एक गुपित सांगतो तुला

काळ्याभोर केसांत तुझ्या .

गजरा माळू दे मला

हळूचएक गुपित सांगतो तुला ..


  फिक्या तुझ्या ओंठा वर 

Lipstick लावू दे मला 

हळूच एक गुपित सांगतो तुला ..

तुझ्या हातावर
मेहंदी काढू दे मला
हळूच एक गुपित सांगतो तुला

पायात तुझ्या पैंजण शोभून दिसे खास
तुझ्यासाठी आणलय आज
ते पैंजण घालू दे मला
हळूच एक गुपित सांगतो तुला ..

भांगेत तुझ्या शिंदुर शोभून दिसे माझ्या नावाचे
ते मला आज माझ्या हातानेच भरायचे .
ते भरू दे मला
हळूच एक गुपित सांगतो तुला ..

गळ्यात तुझ्या मंगळ सूत्र माझ्या नावाचे
आज मला नव्याने घालायचे .
ते घालू दे मला ..
हळूच एक गुपित सांगतो तुला ..

दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...