एक स्वप्न मी ही पाहिलं होतं ..
तुझ्यासोबत जगण्याचं ..
आयुष्य नावाचं किताब तुझ्या साथीने लिहिण्याच .
प्रेमाची उपमा द्यायला झाले होते सज्ज .
स्वप्न होतं ते हळवं ..
बघणार ते वेड मन ही होत निस्वार्थ .
आयुष्याची संध्याकाळ ,
तुझ्यासोबत सरेल , वाटल होतं .
प्रवास अर्ध्यावर सोडून जाशील कधी वाटलच नव्हत .
मनाचा एक हळवा कोपरा ,
सहज दिला होता तुला ..
तरीही तू सोडून गेलास मला ..
असंख्य वेदना देऊन मनाला ..
डाग लावून गेलास की रे आपल्या नात्याला ..
माझ्या स्वप्नाना तुडवून पायदळी ..
आता कशीच आठवण नाही येत वेळोवेळी ..
दुर्गा मते
खुपच सुंदर 👌👌👌👌
ReplyDelete