नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 22, 2022

सकारात्मक नजर.

हा विषय असा तसा नाही.  सुचला आज एका मैत्रिणीशी खूप वाद घातला ..😜😜मी वाद घालण्याच्या बाबतीत अव्वल आहे .  कोणीही मला अवॉर्ड देईल .😂😂 पार्ट ऑफ जोक .

सकारात्मक नजर असेल ना तर जग सुंदर दिसेल . आणि तिचं नजर जर नकारात्मक असेल ना , तर सुंदर असणार जग ही कुरूप वाटेल .

असच एक वाक्य तिने ऐकवल ..." मतलबी दुनिया " हे शब्द मला खूप खटकले . कारण ह्या मतलबी दूनियात ही खूप चांगले माणस आहेत . सगळेच सारखे नसतात . खूप वाईट लोक असतात . हेचं वाक्य जर उलट करून बघितल तर किती छान होईल .

" सगळे च सारखे नसतात . खूप चांगली माणस ह्या समाजात असतात . " ऐकायला ही किती छान वाटतं . हे वाक्य आणि खरच हे वाक्य खरं आहे . सगळेच माणस चांगली नसतात . आणि सगळेच माणस वाईट ही नसतात . 50- 50 टक्के समजू आपण .

Infact कुठलाच व्यक्ती वाईट नसतो . त्या व्यक्तींमधली गुण वाईट असतात.  ती  वाईट गुण न बघता त्याच्यातील फक्त चांगले गुण बघून व्यक्ती जज करायचा . म्हणजे त्या व्यक्ती बद्दल असणाऱ्या  तक्रारी कमी होतात  . आणि त्या व्यक्ती साठी जो फॉर्म्युला वापरला ना तोच फॉर्म्युला समाजातील इतर लोकांसाठी यूज करायचा . म्हणजे आपल्याला हे जग सुंदर दिसेल . ह्या जगातील प्रत्येक व्यक्ती सुंदर वाट्टेल .

आपले विचार चांगले असतील ना . तरच आपल्याला जग चांगलं वाट्टेल .

खरं तर ह्या जगात कोणीच कोणाचं नसत . रक्ताची असतात . पण ती ही वेळ प्रसंगी कामी येईल की नाही. ह्याची खात्री नसते. मानलेली असतात . अपेक्षा नसताना ती अनेकदा गरजेच्या वेळी उपयोगी येतात.  किती आभास आहे . हा आभास नाही आपले - परके मनी रुजवू नये . ही नवी शिकवण आहे . तिचं ज्ञान घेणं राहूनच गेलं . मानवाचं जीवन ' ये दुनिया मतलबी ' वाक्य गिरवण्यातच सरलं .

अहो ह्या मतलबी दूनियेत आपण राहतो . वावरतो . त्या मतलबी दुनियेत आपली गणना सहज होऊ शकते . हे न विसरणे जमल म्हणजे ' दुनिया मतलबी ' हे वाक्य पुन्हा म्हणण्याची हिम्मत होणार नाही .

हा लेख लिहिण्याचा उद्देश एवढाच. 

दुनिया मतलबी नहीं है ।
मतलबी तो अपनी नजर है ।।
जब दुनिया हमारे हिसाब से चलने लगती है ।
तब वो हमे प्यारी लगती है ।।
और वो जब उनके हिसाब से चलने लगते है ।।
तब  वो हमें मतलबी लगने लगती है ।।
मतलबी दुनिया नहीं ।।
मतलबी तो अपनी नजर है ।।
दुर्गा मते...

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...