नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 22, 2022

माझ्या एवढं प्रेम करू शकत नाही

माझ्या एवढं प्रेम ,
तुझ्यावर कोणीच करू शकत नाही ,

कारण मला तुझ्या कडून कोणतीच अपेक्षा नाही हे ..


तू माझ्या नावापुढे तुझ नाव लावावं ...

माझ्यासाठी साऱ्या जगाशी भांडांव ..

अशा कोणत्याच खुळ्या अपेक्षा माझ्या नाही ...

मी तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करते ....


तुझ्या सोबत सात पावलं ,

चालण्याच स्वप्न पाहत नाही ..

सात जन्म तुझा सहवास लाभावा एवढंच वाटतं ..

तुझ्या पासून दूर जाण्याचं धुकं मनात दाटत ..


मला तुझ्याकडून कसल्याच अपेक्षा नव्हत्या .
आणि कधी नसेन ..
अपेक्षा फक्तं एवढीच ..
माझ्या प्रेमाचा तू स्वीकार करावा ,
आणि आपलं नातं आपल्या दोघांपुरतं ..
अभाधित ठेवावं ..
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...