लग्नाआधी विधवा झाले ..
का कुणास ठाऊक ,
कोणत्या जन्मीचे भोग नशिबी आले ..
अंगाला हळद लागली ...
सुखाची एक झुळूक आली ..
क्षणात विर्गळून ही गेली .
सप्त पदी चालण्याआधी पाऊल गोठली ,
लग्नाआधी मी विधवा झाली ...
गावभर चर्चा माझ्या पांढर्या पायाची .
लेक अपशकुनी मी जन्मा आधीच का नाही मेली ..
अशी विनवणी आज देवास केली ..
देवाने ही आज माझ्या कडे पाठ फिरवली .
दुर्गा मते
काल्पनिक रचना माझ्या वास्तवाशी संबधित नाही ..
खुपच वेदनामय रचना केलीस नित्या पण लिखाण मात्र अप्रतिम 👍🏼👍✍️✍️✍️👌👌👌
ReplyDelete