दे तू वचन आज हे नाते जपण्याचे ..
फेड पारणे तुझ्या माझ्या मैत्रीचे ..
अबोल भाषा गांधळले शब्द .
करते आज तुला मी वचनात बंध ..
रसाळ शब्दांना तुझ्या पैलतीर गाठायचे ..
ह्या प्रवासात शेवटच्या स्टॉकवरचं थांबायचे ..
फुलाचे फुलणे सुंगध पसरवतात...
तुझ्या माझ्या नात्याच्या भावना त्या हूनही
सुंदर फुलतात .
मधाची गोडी ह्या नात्यात चाखायची ..
तुझ्या आयुष्यात नसताना सुद्धा तुझ्यासाठी स्वप्न पाहायची .
तुला माझ्या आयुष्यात कृष्णची द्यायची आहे जागा .
सांग तुझ्या आयुष्यात ह्या राधे साठी आहे का कप्पा रिकामा ...
देशील का वचन मला तुझी राधा बनवण्याच ..
वचन हे आयुष्यभर निभवण्याच ..
दुर्गा मते
अप्रतिम 👌
ReplyDeleteछानच .....👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
👍