तुझ्यासाठी रे पिला , मी हा जन्म मागितला ,
तुझ्या साठी मी रे जीव वाहिला .
नऊ मास रक्तात माझ्या जपले तुला .
तू अंश माझे रे प्रिय मला ..
चाहूल तुझ्या येण्याची लागली ...
स्वप्न माझी सारी तुला मी वाहिली ..
गुंज मनीचे तुझ्या जाणून घेतले.
रडणे तुझे त्या अभाळाला अर्पिले ..
तुझ्यासाठी बाळा मी रे जन्मले ..
दुर्गा मते
खूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर रचना 👌👌
ReplyDelete