नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 26, 2022

असावा असा एक मित्र..

असावा असा एक मित्र ...
खळखळून हसणारा आणि हसवणारा ..
सावली बनुन सतत सोबत चालणारा ..

असावा असा एक मित्र ...
न सांगताच मनातलं दुःख ओळखणारा ...
डोळ्यातील अश्रू त अबोल वेदना वाचणारा ..

असावा असा एक मित्र ..
समाजाचे वार झेलून मैत्री कायमस्वरूपी जपणारा ..
प्रवास ह्या नात्याचा कधीच न थांबवणारा ..

असावा असा एक  मित्र ..
हृदयात घर करून राहणारा ...
पुरुषार्थ कधीच न गाजवणारा ...

असावा असा एक मित्र ..
मैत्रीचं हे पवित्र बंधन जन्मोजन्मी जपणारा ..
कुठल्याही परिस्थितीत कधीच साथ न सोडणारा ..

असा असा एक मित्र ....
ज्याच्या सावलीत आई वडील आणि नवरा ..
ह्याच्या एवढंच सेफ वाटेल ..
असावा असा एक तरी मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात ..
दुर्गा मते

1 comment:

  1. खरच असावा असा एक मित्र 👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...