निरोप हा भरल्या डोळ्यांने ,
देते आज तुला प्रेमाने ..
जाऊ नकोस रागाने ..
असू दे मनी , भेट होईल नव्या क्षणी ..
जाईल गळून पानं पिकलेली ..
आयुष्याच्या सरत्या वेळी ..
बहरेल प्रीत हरवलेली ..
असू दे मनी , भेट होईल नव्या क्षणी ..
गोंधून ठेव मनात ..
जरी सोडेल आज हात .
येईल परतुनी पुन्हा जीवनात
असू दे मनी, भेट होईल नव्या क्षणी ..
रीत - भात ओलांडून येईल तुझ्यासाठी ..
स्वीकार तो गृहप्रवेश माझ्यासाठी ..
अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ..
असू दे मनी , भेट होईल नव्या क्षणी ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.