कसे फेडू तिचे पांग
सांग देवा सांग , कसे फेडू पांग ..
वसा घेतला ज्ञानेश्वरी वाचण्या चा ,
कळला मज अर्थ सुखी आयुष्याचा ..
लयास गेला राग - द्वेष मनीचा .
मनाच्या शिंपल्यात जपला मोती माणुसकीचा .
कुजलेल्या बुध्दीला नाही ,
कधी कळली ओविची भाषा ,
अर्थ त्याचे समजुंन घेता ,
दूर झाली निराशा ..
सहा वर्षाची असताना ,
वडिलांनी दिली हातात ,
रोज निदान पाच ओव्या तरी वाच ,
रुजवले मनात ..
त्यांचे आज मनापासून आभार ..
दिली त्याने ज्ञानेश्वरी हातात ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.