नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 4, 2023

एक सच्चा मित्र हवा असतो तिला

आयुष्यात हवा असा एक मित्र ..
कधीही हाकेला धावून येणारा ..
स्वार्थासाठी नाही ,तर निस्वार्थी पने मैत्री जपणारा ..
डोळ्यांत कधी चुकून अश्रू आलेच ..
तर हळवा होणारा ..
तुझ्या डोळ्यांत हे शोभून नाही दिसतं ..
असं म्हणत स्वतःच रडणारा ..
शरीरावर नाही तर ,मनावर राज्य करणारा ..
कारण ह्या शरीरावर नवरा राज्य करतो की ..
मनावर राज्य करायचं तेव्हा त्याचा पुरुषार्थ जागा होतो .
आयुष्यभर नवराच साथ देतो . हे वाक्य कितीही 
खरं असलं तरी ...
ही 💯💯 हेचं सत्य ..
स्त्री ला तिला आयुष्यभ र सांभाळणारा नुसता लाईफ 
पार्टनर नको असतो .
तर तिच्यावर खरोखर प्रेम करणारा ..
तिला हवं तस जगू देणारा .
तिच्या ई श्चा - आकाक्षांना वाव देणारा ..
तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणारा .
तिच्या सोबत तिच्या सारखंच होऊन आयुष्य
जगणारा एक सच्चा मित्र हवा असतो .
written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...