नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 6, 2023

सुंदर चित्र

कोऱ्या पानावर चित्र रेखाटले आयुष्याचे ..
समीकरण सोडवून ठेवले भविष्याचे ..

रेखाटलेल्या चित्राला बघू लागले डोळे भरून ..
बघताना ते चित्र आले गहिवरून ..

किती सुंदर रचना होती त्याची ..
त्यात कमी नव्हती कशाची ..

घर भरलेले होते आनंदाने ..
जुळले होते बंध आपुलकीचे ..

सुंदर वीण बांधली त्याची माझी ..
बांधली होती गाठ सात जन्माची ...

आशीर्वाद दिला होता साऱ्यांनी ..


सुखी आयुष्याचा प्रवास सुरू झाला त्याच्या साथीने ..


कोऱ्या पानावर चित्र रेखाटले होते सुंदर ...

नव्हते त्यात कशाचे अंतर ..
चित्र रेखाटले होते ते सुंदर ..

Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...