काव्य पुष्प कवी कविता ..
दिनांक - 7 - 12 - 2022
विषय - तिचं अस्तित्व ..
साहित्य प्रकार - लेख ..
शीर्षक - तिचा सहवास ..
तिचा सहवासचं तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.
तिचं असणं सर्वांना हवं हवंस वाटतं. तिच्या असण्यानेचं घराला घरपण येतं. उगाच नाही तिला गृह लक्ष्मी म्हणतात ...तिच्या शिवाय कुटुंब ही पूर्ण होतं नाही . आणि खुश ही राहू शकत नाही ..
ती घरात असली की घर कस भरल्या भरल्या सारखं वाटतं . चार दिवस गावी गेली की लगेच तिची उणीव भासते .
ती आई , बाबा , अहो ... " अरे ! बाळा घे ना ये दूध पिऊन " असं म्हणत सर्वांच्या पुढे पुढे करते . तेव्हा खरचं खूप प्रसन्न वाटतं . तिच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडावंस वाटतं .
पदर कमरेला एका हाताने केस सावरत ती जेव्हा किचन मध्ये लुडबुड करते तेव्हा फक्त तिच्याकडेच टक लावुन बघावंस वाटतं .
सकाळी सकाळी सर्वांची उठायची घाई आणि तिची मंजुळ आवाजात सुरेख आरती ... घरातील सर्व वातावरण प्रसन्न होऊन जाते .
ती हसते तेव्हा अजूनच सुंदर दिसते ..
तिचा कोमल स्पर्श ती जेव्हा करते ..
तेव्हा ती अजुनच आवडायला लागते ..
तिच्या सहवासाने स्त्रित्वाची खरी परिभाषा समजायला
लागते ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.