हृदयाची अबोल स्पंदने ..
तुझ्यासाठी राखून ठेवली ..
प्रीत मनी तुझ्यासाठीचं जागली .
आज वर मी तुझ्यासाठी त्यागली ..
वाट बघायची राऊळा
त ..
स्वप्नं रंगवायची मनात ..
उपास तापास करायची देऊळा त ..
हरवून जायचे अनोख्या विश्वात ..
हरवलेल्या जगात एकटीच भटकायचे ..
का कुणास ठाऊक कोणासाठी ..
पण ; खूप मटकायचे ....
निराशा पदरी पडली की मात्र खूप रडायचे ..
स्वप्नांच जग फसव असतं ..
तिथे काही खरं होणार नसतं ..
मग स्वतःला चं समजावायचे ...
नव्या उमेदीने पुन्हा श्वास घेण्यास उठायचे ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.