नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 10, 2022

देवबाप्पा स पत्र

काव्य पुष्प कवी कविता ..

दिनांक - 10 - 12 - 2022

विषय - देवास पत्र .

सर्व प्रथम काव्य पुष्प परिवाराचे खूप खूप आभार ..त्यांनी खूपच सुंदर विषय दिलाय लिखाणासाठी ..🙏🙏

प्रिय देवबाप्पा  ..

तूला माझा साष्टांग नमस्कार 🙏

सर्व प्रथम तुझे  खूप खूप आभार तू मला हे सर्वांग सुंदर आयुष्य दिलं .. त्यात ही स्त्री जन्म दिला ...दोन कुटुंबाची लेक होण्याचं सौभाग्य मिळालं .

कळत नकळत नेहमीचं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला . माझ्या डोळ्यांतील अश्रू नेहमीचं पुसले . मला तुझ्या आशीर्वादाने जे हवं ते सारं मिळालं ..आणि जे  नसेल मिळालं ते कदाचित माझ्या साठी चांगलं नसेल किंवा मी ते मिळवण्याच्या योग्यतेची नसेल . मिळालं नाही म्हणून तुझ्यावर राग नाही माझा ..

कारण तू मला गरजेपेक्षा जास्त दिलंय .. स्वतः पेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करणारे आई वडील ...प्रेमळ आजी ..काक्या ..चुलते .. सारच मनासारखं ..सख्खी बहिण नाही पण ज्या चुलत बहिणी आहेत.  त्या कधीही परकेपणा दाखवत नाही . त्यामुळे मला बहिण नाही . ह्या गोष्टीची उणीव भासत नाही . तीन तीन भाऊ आहेत खूप प्रेम करणारे . जीव लावणारे ..


गरजे पेक्षा जास्त समजून घेणारा नवरा दिला . प्रेमळ आणि मनासारखं वागू देणारे सासू सासरे दिले . माझ्यावर खूप प्रेम करणारे दोन छान - छान पुतणे दिले .
आणि सर्वात महत्त्वाच मला खूप लवकर आई होण्याचं भाग्य दिलं ..त्यासाठी तुझे मनापासून खूप खूप आभार ..

आता फक्त एकच मागणं आहे .

माझ्या पोटात जो माझा अंश वाढतोय ना त्याला खूप  सुंदर आणि निरोगी आयुष्य दे ..त्याला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सुखरूप ठेव . मला जे काही नाही मिळालं ना  , ते सारं त्याला मिळू दे . त्याच्या वाट्याला सुख च दे अस नाही म्हणणार मी दुःख ही दे...चांगले वाईट अनुभव ही दे ..त्याला एक सच्चा नागरिक बनण्याची जिद्द दे ...
जसा मला छान लाईफ पार्टनर मिळाला ..ना तसचं त्याला ही त्याच्या वाट्याच सार सुख मिळू दे ..

आणि सर्वात महत्त्वाच मला माझ्या पूर्ण भरलेल्या कुटंबा समोर मरण दे . मी माझ्या आयुष्यात माझ्या डोळ्यांसमोर कोणालाही मिस नाही करू शकत ..
माझं पूर्ण आयुष्य सेट्टल झाल्यानंतर माझ्या बाळाचं आयुष्य सेट्टल झाल्यानंतर ..सगळं ठीक होईल ना .... ज्याचं मरण जवळ आलं असेल ते मरण मला दे ..कारण मी माझ्या पूर्ण कुटुंबावर खूप प्रेम करते ..हा मी मेल्यानंतर ही माझ्या बाळाचे माझ्या नवऱ्याचे माझ्या आई वडिलांचे हाल नाही होऊ द्यायचे ...माझ्या नंतर तू त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहायचं ..

तुझीच लाडकी लेक
दुर्गा  ...

आणि हो कळत नकळत काही चुकीचं बोलल्या गेली असेल तर , माफ कर बाप्पा कारण माझा अनुभव खूप कमी आहे अजुन ..

Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...