तू मला पर्सनल स्पेस दिली ..
मी तुझ्यातील क्वालिटी ओळखली ..
तिथूनच तर खरी सुरुवात झाली मैत्रीला ..
निखळ मैत्री ...
हवा हवासा वाटणारा संवाद ..
एकमेकांमध्ये मुरणारा गोड सहवास.
किती सुंदर ना ..
ते क्षण मी तुझ्यासवे जगलेले ..
आयुष्यभर ही मैत्री जपण्यासाठी किती त्यागले. .
हे फक्त तुलाच माहीत.
आज ही हवा हवासा वाटतो ..
तो गोड संवाद ..
अजुनही हवासा वाटतो तुझा सहवास .
एकदा नव्याने पुन्हा ...
द्यावासा वाटतो तुला मैत्रीचा हात ..
तो ही आयुष्यभरासाठी अर्ध्यावर सोडण्यासाठी नाही.
तू ही धरशील ना माझा हात घट्ट पकडून ..
आणि होशील ना साथीदार माझ्या मैत्रीचा ..
खूप सुंदर रचना
ReplyDelete