नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 15, 2022

प्रेम एक धोका

काव्य पुष्प कवी कविता .

दिनांक - 15 - 12 - 2022

विषक - ओढ

साहित्य प्रकार अलक .

शीर्षक - प्रेम एक धोका ..

तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं . त्याच्या म्हणण्यानुसार घरून पळून जाण्याचा निर्णय तिने कठोर मनाने घेतला होता ....

त्याच्या सांगण्यानुसारचं तिने घरून दागिने पैसे चोरुन आणले होते.  त्याने खूप हुशारीने तिच्याकडे असणारे दागिने आणि पैसे आपल्या ताब्यात घेतले ..आणि तिला सांगितले मी येईपर्यंत माझी ह्याचं स्टॉप वर वाट बघत उभी रहा ..


ती बिचारी तो येईल ह्या ओढीने त्या स्टॉप वर गेली दोन दिवस त्याची वाट पाहत उभी होती...पण तो काही आला नाही ......ती त्याची वाट पाहून पाहून थकली .  आई वडिलांच्या प्रेमाच्या काळजीच्या ओढीने पुन्हा घरी परतली ..

Written by - durga 

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...