जगताना आज ही मरते ..
माझं मलाच माहीत कशी ?
मी तुझ्याशिवाय जगते ..
प्रेम केलं तुझ्यावर ..
शिक्षा भोगते आजही ..
आई वडिलांसाठी सोडली साथ तुझी ..
खरी आहे जूबानी माझी ..
प्रेम आणि कर्तव्य ...
ह्यात श्रेष्ठ कर्तव्य ..
आणि मी तेच निवडलं ..
तरी ही तुझ्या वाट्याचं प्रेम अजुनही मनात जपलं .
धोकेबाज , मतलबी ,
ह्या उपमा देऊ नकोस तू मला ..
किती प्रेम करायचे मी तुझ्यावर ..
आठव तू माझ्यातील तुझ्या प्रियसिला ..
बिन मुडाचे आरोप नको करूस माझ्यावर ..
खरं सांगते आज ही जिवापाड प्रेम करते रे तुझ्यावर ..
फक्त जाबाबदाऱ्यांच्या बंधनात बांधल्या गेले ..
ह्याचा अर्थ तुला विसरले ..
असा नाही होतं ..
माझ्या आयुष्यातील तुझी जागा दुसरं कोणीही नाही घेऊ शकत ..पण मी पुन्हा तुझ्या आयुष्यात पुन्हा परतू ही नाही शकत . कारण आता आपल्या वाटा वेगळ्या आहेत . आणि मला माहितेय मी जर आता तुझ्या आयुष्यात पुन्हा परतले ..तर तू डिस्टर्ब होशील .. आणि माझ्यामुळे तू डिस्टर्ब व्हायला नकोय मला . तू खूप मॅच्युअर आहेस . खूप पुढे जाशील आयुष्यात .
राधा कृष्णाचं प्रेम ही कधी पूर्ण झालं नाही . मग आपलं तरी कसं होईल . आपण तर सर्व सामान्य माणस ! राधा कृष्णाच्या प्रेमाची दुसरी बाजू माहितेय . ते अपूर्ण ही राहील नाही . कधाचीत तसचं असावं आपलं भाग्य .
विचार कर आज मी तुझ्यावर निस्वार्थी पने प्रेम करते . नशिबाने मी जर तुझी झाले असते . तर कोणी सांगितल मी आजही तुझ्यावर प्रेम केलं असतं. कदाचित माझ तुझ्या विषयी असलेलं मत बदललं असतं. आणि त्या बदललेल्या मता बरोबर तुझ्यावर असलेलं प्रेम ही कमी झालं असतं.
बरं झालं मी प्रेम आणि कर्तव्य ह्यात कर्तव्य निवडलं कारण कर्तव्य तर श्रेष्ठ ठरलचं पण माझ प्रेम ही श्रेष्ठ ठरलं.
आणि नियतीने घेतलेल्या परीक्षेत मी पास ही झाले. आणि आई वडिलांच्या नजरेत ही शाबूत राहिले.
खरचं अभिमान वाटतो माझा जरी मी तुला , मी तुला कशाला तूच मला गमावलं ....
मी काहीचं न गमवता खूप काही मिळवलं...
हा वैचारिक लेख आहे. ह्याचा माझ्या आयुष्याशी काही संबंध नाही. फक्त वैचारिक पद्धतीने लिहिलेला आहे.
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.