तुझ्या असण्याने किती सुंदर ओळी ..
नशिबाच्या रेखाटल्या ...
हाता वरच्या रेषा ही सजल्या ..
सबोवताली असलेल्या बागा ही फुलल्या ..
भावना अनोळखी मनी स्फुरल्या ..
जीव माझा गुंतला तुझ्यात ..
श्वास तुझा स्फुरला माझ्यात ...
दोघेही खुश एकमेकांच्या आयुष्यात ..
सामील झालो सहजीवन एकमेकांत ..
आता आस ना राहिली कुणाची ..
मधाळ गोडी चाखते मी तुझ्याच प्रेमाची ..
ओठी रोजचं खुले कळी हास्याची ..
तुझ्यासवे किती सुंदर ओळ रेखाटली माझ्या नशीबाची ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.