पुस्तकांचे जग माझे ..
माझ्या जगात मी हरवून जाते ..
स्वप्नांना शब्दात मांडते ...
शब्दांना मनात साठवते ..
कल्पनेचा गंध सुरांना देते...
सुर हलकेच गुणगुणते....
पुस्तकांशी एकरूप होते ..
नव चैतन्याचे बीज मनी रुजते ..
ओळींचा अर्थ समजून घेते ..
सुविचार जीवनात माझ्या लागू करते...
उंच भरारी घेण्याचे स्वप्न पाहते ....
पुस्तकांच्या जगात खरोखरचं हरवून जाते ..
No comments:
Post a Comment
Comments plz.