नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 27, 2022

अनमोल क्षण

अनमोल क्षण ..
मनाच्या कुपीत जपून ठेवले ...
जपून ठेवलेल्या क्षणांना

आठवणींचे तोरण बांधले ..

सुख - दुःख ..
दोन्हीही सवडीने जपले ..
प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकले ..

म्हणून ते सारेच क्षण अनमोल ठरले ..

जीवन जगताना ..

फक्त आनंदच नाही वेचला ..

ह्या हळव्या मनाने ..

दुःखाच्या झळा ही सोसल्या ..

सोसलेली प्रत्येक झळ ..
हवी हवीशी वाटू लागली ..
कारण तिचं झळ जगण्याची प्रेरणा देत गेली ..

त्यामुळे माझ्यासाठी ..

प्रत्येक क्षण अनमोल ठरले ..

त्यानीच माझे सुंदर आयुष्य घडवले .


Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...