नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 22, 2022

शीर्षक - निरागसता खूप सुंदर असते..

काव्य पुष्प कवी कविता ..

दिनांक - 22- 12- 2022

विषय - गुंता

प्रकार - अलक ..



त्यांच्या लग्नाला जवळपास महिना झाला असेल , तरीही त्यांच्यात नवरा बायकोच तर नातं नव्हतंच पण साधं माणुसकीचं ही नातं नव्हत . तो खूप समजूतदार आणि ती आपलंच खरं ठरवणारी ..
त्याच्यात ती आधीच कोणावर तरी खूप प्रेम करत होती.  आज तिचा लास्ट इअरचा लास्ट पेपर होता . 

तिचा नवरा तिची बाहेर वाट पाहत उभा होता . आणि तिने मनातून ठरवलं होतं.  आज पेपर संपल्यानंतर प्रियकरा सोबत पळून जायचं . पेपर सुटला ठरल्या प्रमाणे ती मागच्या दिशेने जाऊ लागली . 

जाण्याआधी तिला दिसला तिच्या नवऱ्याचा निरागस चेहरा त्याच्याकडे बघता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली . 
आणि पळून न जाता त्याच्याकडे धावत आली आणि  त्याच्या मिठीत शिरली ..

Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...