नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jul 2, 2022

जन्म दिला म्हणजे मातृत्व पूर्ण नसतं ..

मी हा लेख स्वअनुभवावरुन डोळ्या समोर पाहिलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीची प्रचंड आलेली चीड ह्या
कसोटीच्या आधरावर लिहत आहे ....

जन्म दिला म्हणजे मातृत्व पूर्ण होतं नसतं ..

आईचं कर्तव्य फक्त त्याला नऊ महिने नऊ दिवस आपल्या गर्भात वाढवून त्याला नऊ महिन्यानंतर व्यवस्थित रित्या जन्म देऊन पूर्ण होतं नसतं तर , त्याचं व्यवस्थित रित्या पालन पोषण त्याच्यावर चांगले संस्कार देऊन पूर्ण होतं असतं ...


बाळ जन्माला यायच्या आधी जी आई आपल्या बाळासाठी सुंदर सुंदर स्वप्न बघते ना , तिचं आई तिचं मातृत्व चोख बजाऊ शकते ..

       द्यायचा म्हणून द्यायचा बाळाला जन्म त्याला काहीही महत्व नसतं . ते बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं व्यवस्थित रित्या संगोपन करण सर्वात जास्त महत्त्वाचं असतं .

एक आदर्श आईचं एक आदर्श बालक घडवू शकते . एक आदर्श बालक घडवायचा असेल तर , आधी एक आदर्श आई घडवावी लागेल . तरच कुटुंब सुंदर वाटेल कुटुंब सुंदर वाटता वाटता हे जग सुंदर वाटेल ..


मी माझ्याच कुटुंबात पाहिलेली सत्य परिस्थिती आहे. 


आईने बाळाला जन्म दिला . कधीचं तिने त्याला हाताने जेवू घातले नाही .. वेगवेगळे पदार्थ आवडीने खाऊ घातले नाही. कधीं त्याची शी धुतली नाही ;  की कधी त्याला पाटीवर  " अ आ इ इ " गिरवायला शिकवलं नाही ...


देवासमोर कधी "  शुंभ करोती कल्यांनम " म्हणायचं असतं   . ते ही त्या बाळाला माहीत नाही .

बाळ ही शहाणं ते जेवण करायचं की त्याला मोबाईल हवा . काम सांगितल की त्याला पैसे हवे . कधी  आईने त्याला शिकवलंचं नाही . मोबाईल आणि पैसे लहान बाळाने वापरू नये .. बाळाला शेवटी मोबाईल आणि पैशाचं प्रचंड वेड लागतं व्यसन लागतं ..आई आता त्याच्या व्यसनाला कंटाळली बाळाने ऐकल नाही . जास्त हट्ट केला की ,  आई फक्त धनाधन मारते . मार खाऊ खाऊ ही ते बाळ लापट झालं . वेदना म्हणजे नक्की काय ? ते त्याला उमजेनाचं ..मानसिक संतुलन पूर्णपणे हरवलं ..आई एक राक्षस अस चिन्ह त्याच्या डोळ्यांसमोर फिक्स झालं .


आईची सावली जरी नजरेस पडली तरी त्याच्या दोन्हीं डोळ्यातून प्रचंड अश्रूधारा वाहू लागतात . ईवलुशा त्या कान्हाच निरागस बालपण नरक यातना भोगण्याच्या ही पलिकडे झालं ...


अशी असावी का ? आणि मुळात अशा आई ने  एका निरागस बाळाला जन्म चं का द्यावा ..?  हा प्रश्न मला पडला आणि म्हणून मी हा लेख लिहिला ..


आई " प्रेम , माया , ममता , करुणा , जिव्हाळा ह्याचं प्रतीक असते   . तिच्या त्या प्रतिकावर कुठल्याच बाईला अधिकार नाही हे , कलंक लावण्याचा .


जर तुम्ही आई म्हणून परिपूर्ण होऊ शकत नसाल ना तर तुम्ही आई न  होता . वांझ राहिलेलं कधीही चांगलं . कारण तुमच्यातील एक राक्षस आई दुनियेतील हजारों चांगल्या आईंना वाईट ठरवते ..


मी हा लेख कोणाचेही मन दुखावण्याचा हेतूने लिहिलेला नाही . वाईट आयाना चांगला सल्ला देणं हाच माझा प्रामाणिक प्रयत्न होता . हे कोणाच्याही वयक्तिक आयुष्याशी संबधित नाही . ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी ..

दुर्गा मते - 

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...