माणूस कोणताही असो त्याला नजरेची भाषा कळायला हवी ...शब्दाची भाषा काय ? सहज कोणालाही कळते आणि उमजते ..कळायला हवी ती नजरेची भाषा ..
आपल्या समोरचा व्यक्ती खुश आहे की नाराज ,
फ्री आहे की टेन्शन मध्ये आहे . हे त्याच्या डोळ्यांमध्ये डोळे घालूनच ओळखता आलं पाहिजे ..
कोणत्याही अनोळखी व्यक्तीसाठी किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीचे उदाहरण देण्यासाठी मी हा लेख लीहत नाही ...
तर हा लेख मी त्या व्यक्तीसाठी लिहत आहे ...
जी आपल्याला आपली वाटतात ...त्यांचं सुख दुःख हक्काने वाटून घ्यायला आवडत . ते नाराज असले की आपोआप आपण ही नाराज होतो . ते खुश असले आणि जरी आपण दुःखी असलो तरीही , ते दुःख लपवून त्यांच्यासाठी खुश राहण्याचा प्रयत्न करतो ..हा लेख त्यांच्या नजरेची भाषा सहज कळावी ह्या हेतूने लिहत आहे ..
उदाहरण द्यायचं झालं तर आपला life partner त्यांचं दुःख त्याने न सांगताच कळायला हवं ..
अबोल शब्द त्याचे .. त्याच्या नजरेत वाचायला हवे ...
त्याच्या डोळ्यातील ओघळणारे अश्रू प्रेमळ शब्दांनी वेचायला हवे . मन हलके करण्यास त्याचे नकळत कारण आपण ठरावे . दुःख त्याचे आपल्या डोळ्यात बघताच विरावे ...
नजरेची भाषा नजरेला कळावी ...
प्रेमाची कळी आपोआप उमलावी ..
सुखी संसाराची बाग बहरावी ..
आनंदाला भरती यावी ...
नजरेची भाषा नजरेला कळावी .
प्रेमाची कळी आपोआप उमलावी ..
Written by - durga mate ..shejul ..
No comments:
Post a Comment
Comments plz.