किती प्रेम करायचे मी तुझ्यावर ..
आणि तू ही किती करायचस माझ्यावर ..
किती सवय झाली होती. मला तुझी ,
आणि तुला. माझी ..
एकमेकांशिवाय एक क्षण ही करमायचं नाही ..
तुला माझ्याशिवाय सूचायचंस नाही दुसरं काही ..
हसायचो , खेळायचो , रडायचो , जिवापाड प्रेम करायचो
चोवीस तास एकमेकांसाठी अवेलेबल रहायचो ..
पूर्णपणे मी गुंतले होते तुझ्यात ..
आणि तू ही माझ्यात ...
एकमेकांची साथ देण्यास झालो होतो सज्ज ..
पण बघ ना , नियती कशी विक्षिप्त ..
नकळतपणे एकाच मनाला , दोन जीवाला ..
एकमेकांपासून कायमचे दूर केले ...
आगळे वेगळे हे प्रेमाचे त्रिकोण तयार झाले ..
दुर्गा मते
काल्पनिक रचना माझ्या आयुष्याशी संबधित नाही..
खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना
ReplyDelete