पावसाने फिरवली पाठ ..
शेतकऱ्यांच्या नशीबाची पाटी झाली सपाट ..
कोरड्या दुष्काळाची आली लाट ..
बळीराजा बघू लागला वाट ..
थेंब थेंब बरसणाऱ्या पावसाची ..
खात्री त्याला , बदलेल ती रेखा त्याच्या नशीबाची ..
निराश झाले वाट बघणारे डोळे ..
पापण्यांच्या सभोवताली तळे साचले ..
ज्याच्या भारोश्यावर ,
धरणीच्या कुशीत रक्ताचे पाणी आटवले ..
त्या आभाळाने ही डोळे मिटून घेतले ..
अशा ह्या भीषण परिस्थिती ने हुंदके दाटून आले ..
उभ्या पिकांनी अखेर मृत्यू पत्करला ..
बळीराजाला साष्टांग नमस्कार केला ..
त्यांच्या आयुष्याचा प्रवास त्यांनी तिथेच थांबवला ..
Written by - durga mate - shejul ..
No comments:
Post a Comment
Comments plz.