शब्द प्रेमी महिला मंच आयोजित उपक्रम.
नाव - दुर्गा राजु मते.. शेजुळ .
दिनांक - 11- 7 - 2022
शीर्षक - जित मातृत्वाची ..
आज अनिकेतने अनघाला चक्क 21 वर्षानंतर पहिल्यांदा बघितलं . स्कूल बाहेर ती कोणाचीतरी आतुरतेने वाट बघत होती .
अनिकेत एकसारखं टक लावून तिच्याकडे बघत होता . तिला मारण्यासाठी काहीतरी शोधत होता . समोरच त्याला नारळ विकणारा माणूस दिसला आणि त्याच्या हातातील कोयता त्याने हिसकावून घेतला . अनघावर वार करण्यासाठी तो धावणार तेचं ..शाळेतून एक गोड राजकुमारी येऊन अनघा ला बिलगली . अनघाने ही तिचे कितीतरी गोड - गोड पापे घेतले . जगातील सर्वात सुंदर मातृत्वाच उदाहरण ते वाटतं होतं .
का कुणास ठाऊक त्या दोघींना पाहून अनिकेतच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं . त्याच्या हातातील कोयता ही गळून खाली पडला आणि तो पुन्हा परतीच्या वाटेने निघाला .
No comments:
Post a Comment
Comments plz.