नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jul 11, 2022

सारे नकळत घडले..

शब्द प्रेमी -  महिला मंच 

आयोजित उपक्रम ..

विषय - अल क ..

दिनांक - 11- 7 - 2022

शीर्षक - सारे नकळत घडले ..

नाव - दुर्गा राजु मते .. शेजुळ ..


तो आज खूप डिस्टर्ब होता . कारण काल त्याच्या राणीने त्याच्याशी  लग्न करण्यास  त्याला नकार दिला होता .


अस्ताव्यस्त होता ,  सतत व्हिवळत  होता . त्याला आधीपासूनचं डोके दुखीचा त्रास होता . आणि आज ती डोके दुखी अतिशय वाढली होती .


तो रागाच्या भरात आणि टेन्शन  मध्ये विहिरीकडे धाव घेऊ लागला . तो विहिरीत उडी मारणार तेच त्याची राणी धावत आली . आणि त्याला बिलगली . घट्ट मिठी मारली आणि रडू लागली ...


त्याने ही रडत रडत तिला घट्ट मिठी मारली ...आणि पुढचा मागचा विचार न करता राणी त्याला जवळचं असलेल्या मंदिरात घेऊन गेली . आणि देवाच्या साथीने तिने त्याला सा जन्म साथ देण्याचं वचन दिलं . 


त्याने ही मग आपल्या नावाचा कुंकवाचा टिळा तिच्या माथी लावला . एक सुवर्ण क्षण ह्या भूतलावर साजरा झाला  . दोन मनाचा सहजीवन .. सहप्रवास  अतिशय सुंदर रित्या सुरू झाला ..

3 comments:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...