नाव - दुर्गा राजु मते ..
शब्द प्रेमी महिला मंच आयोजित उपक्रम ..
साहित्यप्रकार - ओळ काव्य
विषय - स्वप्न पाहू उद्याचे ..
शीर्षक - स्वप्न नव्या पिढीसाठी ..
स्वप्न पाहू भविष्याचे ..
जगण्यास देतील ते बळ नवे ..
स्वप्न मनी रुजण्यास धाडस हवे ..
तरच परिपूर्ण घडेल आयुष्य हे ..
आयुष्यात येऊनी ...
स्वप्न पाहू भविष्याचे ..
आयुष्य वाढवू उद्याचे ..
उज्वल भवितव्य घडवू ..
आपुल्याच अंशासाठी ..
आपण आज झिजू ..
स्वप्न पाहू भविष्याचे ..
सुंदर जग बनवू त्यांचे ..
जे नाही मिळाले आपल्याला ..
ते सर्व काही त्यांना देऊ ...
मनी रेखाटुया चित्र नव्या पिढीचे ..
स्वप्न पाहू भविष्याचे ..
ओळ काव्य मी पहिल्यांदाच ट्राय केलं आहे . चुकिस क्षमस्व ..
No comments:
Post a Comment
Comments plz.