नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 22, 2021

इवलस मन ...


इवलस मन माझं आकाशाला गवसणी घालण्याच स्वप्न 
बघू लागलं ...
 कोमजलेल्या मनाला फुलण्याचं आश्वासन देऊ लागलं .

आकाशी झेप घेण्याचे वेध लागले ,
जणू भुईला माझे ओझे झाले  ... 

पक्षी बघते जेव्हा , पक्षी व्हावे वाटते , 
इवलंसं रंगीबिरंगी फुलपाखरू व्हावे वाटते ..

गंध फुलाचे आयुष्याला लाभले असते ,
तर रुसलेली मन ही परतून आले असते ,
म्हणून कधी कधी फुलांचा सुगंध ही व्हावेसे वाटते ...

************
   
             राणी ही कविता तिच्या आईला वाचवून दाखवत होती ..." बघ ना ग ,  किती छान कविता लिहिली आहे . 
कवयित्री ने ..तिचं ईवलस मन आकाशी झेप घेण्याचे स्वप्न बघू लागल .... कोमजलेल्या मनाला आश्वासन देऊ लागल ...मला ही बघायचं आहे ग आई असच एक स्वप्न , सत्यात उतरनार ...आभासी जगातून मला वास्तवात नेणार ...."

तिची आई रागाने तिच्याकडे डोळे मोठे करून बघू लागली ...आणि तिला सांगू लागली ..." हे बघ राणी आमची जेवढी ऐपत होती ...तेवढं आम्ही तुला शिकवलं.
आता आमची ऐपत नाही बाळा तुला शिकवण्याची ..
आता आमची मुख्य एकच जबाबदारी ..तुझ्यासाठी तुला योग्य असा मुलगा बघायचा आणि तुझे दोनाचे चार हात करायचे ...." 

आईच्या अश्या बोलण्यावर राणी खूप नाराज झाली.  राणीचा नाराज झालेला चेहरा बघून आई ही अस्वस्थ झाली ...तिला काहीच कळेना तिच्या कोमजलेल्या फुलाला कस समजावं ते .... आई तिच्याकडे बघते तर , तिच्या डोळ्यांतून टप टप पाणी गळत होत ...  आईच्या ही डोळ्यात नकळत पाणी आलं ..जणू तिच्या डोळ्यातील पाणी हिच्या डोळ्यांत साचलं ...


आई राणी जवळ गेली , तिला मायेने एक झप्पी दिली ..
 आणि म्हणाली. ,.   " स्वारी बाळा ...पण मला तुला कुठल्याच खोट्या आशेवर ठेवायचं नाही बाळा ...जे वास्तव आहे . ते मी तुला सांगितलं बेटा ...तू ही आता हे वास्तव मान्य कर ..." 

" पण आई तुला नाही का ग वाटत ..? मी शिकावं , शिकून खूप मोठं व्हावं ..स्वतःच्या पायावर उभ रहावं .." 
हुंदके देत देत राणी आईला म्हणाली ...

" वाटत होतं बाळा , जेव्हा तू लहान होतीस ..पण आता तू मोठी झालीस बाळा ..समाजाच्या दृष्टीत तू आमच्या डोक्यावरचं ओझ आहे...आणि ते ओझ वेळीच खाली करायला हव . हे प्रत्येक आई वडिलांना वाटतं असतं . आम्हालाही वाटलं तर , ह्यात आमचं काही चुकल का बाळा ...? " 
  आई खूप समजूतदारपने तिच्याशी बोलत होती ..ती ही समजूतदार होती . त्यामुळे आईची सोज्वळ भाषा तिला सहज कळतं होती ...आईला  समजून घेतांना आपली स्वप्न आपल्याला विसरावी लागतील ह्याची तिला जाणं होती ...

" बाळा तू काळजी करू नकोस , मी तुझ आयुष्य आणि स्वप्न अदृश्य होऊ देणार नाही ...मी तुझ्यासाठी एक चांगलाच मुलगा बघेन ...तुझ्या आयुष्याच कल्याण करणारा तुझी सारी स्वप्न त्याच्यात सामावून घेणारा ...
तू फक्त लग्नाला होकार दे , विरोध देऊन कोणाचेही मन दुखवू नकोस ... आयुष्याचं कल्याण होईल राजा ..." 
असं म्हणत आई जरा वेळ शांत राहिली  ...राणीच्या उत्तराची वाट बघू लागली ....

राणी ने शब्दही ही न बोलता  फक्त मानेने होकार दिला. ..आईला ही खूप आनंद झाला ..लेकीने लग्नाला होकार दिला .. दोघींनीही एकमेकींना घट्ट मिठी मारली ...आणि स्वप्न मूर्तीची एक नवी ओढ मनात स्फुरली ...

तुम्हाला ही कथा कशी वाटली ..वाचून नक्की सांगा ...

1 comment:

  1. खुप सुंदर ह्रदयस्पर्शी कथा...अप्रतीम शब्दांकन...👌👍💐🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...