सकाळपासून जान्हवी पार्थशी बोलण्याचा प्रयत्न करत होती . पण पार्थ काही तिला रिस्पॉन्स देईना .
आज हा असं विचीत्र सारखं का वागत असेल . ह्या विचाराने जान्हवी उदास झाली होती .
उदास झालेल्या जान्हवीला बघून जान्हवीची सासू तिला समजावते ,
" हे जान्हवी नको उदास होऊ बेटा . शाळेत भांडण झालं असेल कोणाशी त्याचा राग तो आपल्यावर काढत असेल . होईल थोड्या वेळाने शांत आणि बोलेल आपल्याशी काळजी नको करू ..
डोळे पाण्याने तुडुंब भरलेले उरात दाटलेले हुंदके सांभाळत , " आई उदास कशी नको होऊ , पार्थ ला नेहमी हसताना , बडबड करताना बघण्याची सवय आहे .
पण तो आज सकाळ पासून शांत शांतच आहे . शाळेत जातानाही फार काही बोलला नाही . जाताना मला साधं बाय बाय ही केलं नाही . दररोज साध्या साध्या गोष्टीसाठी त्याला आई लागते .
आणि आज आपली बॅग , आपली पुस्तक , टीपिन सगळ बरोबर घेऊन शाळेत गेला . माझा पेन कुठे ? माझी वही कुठे ? असं म्हणणारा माझा पार्थ आज असा गप्प का ? "
तेवढ्यात मेघना जान्हवी ची मोठी मुलगी तिच्या डोळ्यात आलेले पाणी . आपल्या हाताने पुसते . आणि तिला एक गठ्ठ् मिठी मारते ....
" हे आई रडू नको ना ग , अग पार्थ बोलेल तुझ्याशी तुझ्याशी अबोला धरण्याची हिम्मत नाही ग त्याची . तू आठवून बघ . तू काही त्याला प्रॉमिस केलं होतं का ? की जे तू पाल कळ नाहीस . त्यामुळेस चिडला असेल तो . तू प्रॉमिस पूर्ण केलं की , बघ कसा येऊन घट्ट मिठी मारतो ते. "
" नाही ग बाळा , मी त्याला काहीही प्रॉमिस केलेलं नाही. आणि केलं भी असेल ना , तर लगेच पूर्ण केल असेल ग . तुला माहितेय ना त्याला जी गोष्ट हवी असेल ती घेतल्याशिवाय तो गप्प बसतो का ? "
" Hmm बरोबर आहे तुझ " मग काय झालं असेल ह्याला
ह्या गोष्टीचा मेघना विचार करू लागली .
तेवढ्यात मेघनाचे वडील घरी आले . पार्थ त्यांना खूप घाबरतो . जान्हवी ला रडताना पाहून , त्यांना खूप वाईट वाटलं . " काय झालं जान्हवी ? का रडतेस ? "
जान्हवी काही बोलणार तर तेवढ्यात मेघणाने येऊन पार्थ ची खोडी काढली. आज त्यांचा मुड छान होता . त्यामुळे पार्थ ला त्यांनी प्रेमाने जवळ बोलावलं ...
" पार्थ बेटा , इकडे ये ..." बाबांचे स्वर कानी पडल्यावर पार्थ जरा घाबरला . पण त्याच्या बा बाने त्याला दोनदा आवाज दिला होता . त्यामुळे त्याला जावंच लागलं.
पार्थ मान खाली घालून त्यांच्या समोर येऊन उभा राहिला . त्यांच्या बाबांनी त्याला जवळ घेतले , " काय झालं बाळा ? तू आई शी आज का बोलत नाहीस ..असा अबोला का धरला तिच्याशी ? ती रागवली का तुझ्यावर , की ओरडली ..? "
पार्थं ने मान हलवून नकार दिल्यावर , " मग काय झालं बाळा ? का बोलत नाही तू तिच्याशी ? "
" आठ दिवस झाले बाबा तो चाफा हसला नाही . आई बोलली होती मला तो चाफा दररोज हसतो . मी दररोज त्याला बघतो . तो मला एकदाही हसताना नाही दिसला ."
त्याच्या अशा बोलण्यावर सगळेच हसले , आजीने तर कपाळावर च हात टेकवला . जान्हवी कोणीही हसू नका .
असं डोळ्यांनीच खुणवत होती . तिने त्याला जवळ घेतले आणि सांगितले हो हसतो , ना तो चाफा बघायचं आहे का तुला ? चल , मी दाखवते .
ती मेघनाला सांगते , " तू सर्वांना जेवायला वाढ मी आणि पार्थ त्या चाफ्याच्या ओट्यावर बसून जेवतो आज , सकाळपासून काहीचं खाल्ल नसेल माझ्या पार्थ ने .."
मेघना सर्वांना जेवण वाढते . आणि जान्हवी च्या हातात तही एक ताट देते . ते दोघे जाऊन त्या ओट्यावर बसतात .
पार्थ च केव्हाच एकच रडगाण सुरू , " आई सांग ना ग कधी असणार हा चाफा ..."
" थांब रे बाळा हसेल , आपण एकदा जेवून घेऊया ..."
असं म्हणत ती पार्थ एक एक घास भरवायला सुरुवात करते . आणि घास भरवतांना पार्थ एक गोष्ट सांगते.
" पार्थ तुला माहितेय का ? "
" काय ग आई .."
" हा चाफा आहे ना ... ह्याला डोहाळे लागले .."
" डोहाळे म्हणजे काय ग आई ? "
" म्हणजे एखादी गोष्ट तूर्तास हवी हवीशी वाटते . ती गोष्ट मिळाली नाही ना की नकोस वाटत . ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे हट्ट...."
" हो का ? कशाचे लागले ग आई ह्या चाफ्याला डोहाळे ."
" तुझ्या हास्याचे ....तू हस ना मग बघ ..तो चाफा पण , कसा हसतो . तुला हसताना बघून एक तरी फुल उमलेल .
आणि जे फुल उमलल ते फुल तुझ्या हसण्यात सामील झाल .. असं आपण समजायचं ."
" आई पण उमलेल ना ग , एक तरी फुल मला हसतांना बघून ..."
" हो बाळा तू हस तर खरं ..."
तिच्या त्या बोलण्यावर विश्वास ठेवून आई ला घट्ट बिलगला आणि तिच्या खुशीत च हसू लागला . त्यांची सारी ओढ त्या चाफ्याच्या फुलांकडे होती . तो हसत असतानाच एक कळी अचानक उमलली , जशी ती कळी उमलली , तसा पार्थ अजूनच घट्ट आईला बिलगला ..
" आई ती बघ एक कळी उमलली. माझ्या हास्यात सामील झाली...."
" अरे खरच की रे , अरे व्वा ! पार्थ तू चाफेचे डोहाळे पुरवले की राजा ...."
तो अजूनच खुश झाला आणि आईला जाऊन बिलगला.
आई ही खूप खुश झाली . त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून....त्याला घट्ट मिठी मारून कुरवाळू लागली .आणि पुन्हा रडू लागली . त्याच्या ओठांवरील हास्य बघण्यासाठी सकाळपासून तळमळत होती....!!!
दुर्गा मते...
खुप छान लिहिल आहेस 👌👌👌✍️✍️✍️
ReplyDeleteखुप सुंदर भावस्पर्शी कथा
ReplyDeleteअप्रतिम लेखन
अप्रतिम कथा,सुंदर बेटा
ReplyDeleteअप्रतिम सुंदर ����������
ReplyDeleteनित्याऽ...!!
ReplyDeleteकसलं भारी कथा लिहिली आहे..!
अप्रतिम अप्रतिम..!!👌
🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌
आबा
🙏
अतिशय सुंदर कथा👌👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete