आज त्यांचा पुण्यातील पहिला दिवस , नवीन घर , नवीन शहर आणि एका नवीन नात्याची सुरुवात सगळचं मस्त सुरू झालं होतं ...
आज शेखर पोलीस स्टेशन मध्ये जाणार नव्हता ..कारण
कॉटरस मधील 600 स्क्वेअर फूट चा फ्लॅट ..आणि त्याची आवरा आवर करायची होती ...ते दोघे मिळून त्याचं इवलस घरट छान सजवत होते ...
नित्या सजावटीच्या कामात एकदम परफेक्ट होती ..
त्यामुळे शेखर फक्त तिला तिचा हेल्पर म्हणून मदत करत होता ......
त्याला एक कॉल आला म्हणून तो घरात रेंज प्रोब्लेम असल्यामुळे बालकणीत गेला ....
नित्याला सुटकेस कपटावर ठेवायची होती . म्हणून ती स्टूल वर उभा राहून ते सुटकेस ती कपटावर ठेवण्याचा प्रयत्न करत असते ...जस सुटकेस कपाटावर व्यवस्थित सेट होतं . तसा नित्याचा तोल जातो ....ती पडणार तेवढ्यात
शेखर धावून येतो ..आणि तिला सावरतो ..तिला सावरताना तिची आणि त्यांची नजरा नजर होते ....
आणि नित्याच्या तोंडून नकळत काही शब्द बाहेर
पडतात ...
" कितना प्यार तेरी धड़कन में ,
कितना अपना पन है ,
तेरे हर एक लफ्ज़ में ,
में खोने लगी हूं ,
तेरे प्यार मै ,
बहकने लगी हूं , तेरी हर एक सांस में ।
कितनी लकी हूं मैं ,
शेखर आप जिंदगी में आए हो ।
मेरा हमसफ़र बनकर ।।
Thanks shekhar ...
असं म्हणून ती भानावर येते ..तो ही तिला एक गोड स्मित देतो . आणि माझ एक खूप महत्वाचं काम राहीलं. असं म्हणत बेडरूम मध्ये जातो ....
नित्या ही लवकर लवकर काम आवरून घेते ...फ्रेश होते . चेंज करून घेते ...छान पैकी नेव्ही ब्ल्यू कलरचा गाऊन घालते . केस मोकळे सोडते . तिला त्या नवीन लुक मध्ये बघून शेखर ही घायाळ होतो ...तिच्याकडे बघून एक स्मॉई ल देत बोलतो .. " तू खूप छान दिसत आहे . ह्या नवीन लुक मध्ये ..."
ती नाजूकसं लाजत , smile देत , " thanks
शेखर " अस म्हणत किचन च्या दिशेने जाते ..
सकाळ पासून तिने आज मोबाईल हातात घेतलेल्या नसतो . त्यामुळे ती deta on करून मोबाईल चेक करते ..तर राहुल चे दहा ते पंधरा मेसेज आलेले असते ..
मेसेज ...
" कुठे आहेस तू ? "
" किती दिवस झाले , बोलण नाही आपल् "
" एवढीच का आपली मैत्री .."
......................
असे बरेच मेसेज त्याचे तिला आले होते . तिला त्याचे आलेले मेसेज बघून खूप वाईट वाटतं . कारण ती पुण्यात शिफ्ट होतेय ह्याची तिने त्याला कल्पना दिली नव्हती . लगेच ती त्याला रिप्लाय देते ..
" स्वारी मी मेसेज पाहिले नव्हते ... तुला उद्या कॉल करते .."
" शेखर तू चहा घेणार का ? " किचन मधुनच ती उंच स्वरात शेखरला विचारते ...
" नक्कीच खूप गरज आहे आता " शेखर ही तिला बेडरूम मधूनच उत्तर देतो . ती छान चहा टाकते .. अद्रक विलायची टाकून चहाचा स्वाद ही खूप सुंदर
येतो ...
" हे घे गरमा गरम चहा .." अस म्हणत ती त्याच्यासमोर हातात असलेला ट्रे ठेवते ....आणि होम थेटर ऑन करते.
आणि त्यात ही खूप छान साँग लागतं ...
" चूप तुम रहो , चूप हम रहे ..
खामोशी से जिंदगी से बात करने दो ।।
चुप तुम रहो , चुप हम रहे ।।
ते दोघेही काहीचं न बोलता ते साँग अनुभवत होते . नजरेने एकमेकांना इशारे देत ..स्मित करत होते ...
किती तरी वेळ ते स्वतःला न्याहाळत होते ....न्याहाळता न्याहाळता कधी त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेकले ते कळलेच नाही ...चहा चा गोड स्वाद त्या ओठांवरील चवी पुढे फिका पडला होता .
किती तरी वेळ तो गोड स्वाद ते दोघेही घेतच राहिले ...एवढे ते हरवून गेले स्वतःमध्ये की कोणीतरी दरवाजा वर उभ राहून केव्हापासून बेल वाजवत आहे . हे त्यांच्या लक्षातच आलं नाही ... मग बेल बंद झाली . आणि जोर जोरात दरवाजावर पडणाऱ्या थापा त्यांना ऐकु आल्या.
त्या थाप्पानी ते भानावर आले ...
नित्या सैरा वैरा धावतच किचन मध्ये गेली . शेखर ने ही जावून लवकर दरवाजा ओपन केला . समोर बघतो तर काय ? डी . एस . पी . साहेब ...
" डी . एस . पी साहेब तुम्ही ! " शेखर ने विचारलं
" का ? काय झालं ...यायचं नव्हत का ? "
डी . एस . पी. साहेब मजाक करत बोलले ...
" नाही असं काही नाही . पण ह्या वेळेला याल. याची कल्पना नव्हती . प्लीज वेल कम सर .."
शेखर ने डी. एस.पी साहेबांना आत येण्यास सांगितले ..
" नित्या एक कप चहा आन प्लीज " शेखर ने बाहेरून आवाज देत नित्या ला चहा आणण्यास सांगितला ..
नित्या लगेच ट्रे घेऊन आली .
" तुझी बायको तर सुपर फास्ट आहे " डी. एस. पी . साहेब नित्यांच कौतुक करत बोलले ...
" मग बायको कोणाची आहे " शेखर ने प्रत्युत्तर दिलं .
नित्या लाजतचं किचन मध्ये गेली ..
" शेखर मी इथे आलो , एका खूप महत्वाच्या कामासाठी"
डी. एस . पी .साहेब बोलले ...
" हो , सर बोला ना " शेखर ...
" आपल्याला आता लगेच ...मुंबई बंधोबस्त साठी जायचं आहे . तिथे खूप दहशत पसरली आहे. तू न्यूज लाव आधी . "
शेखर लगेच टी. व्ही ऑन करतो. आणि ती न्यूज बघतो.
नित्या त्यांचं बोलणं किचन मधून लक्षपूर्वक ऐकत होती.
शेखर आपल्याला एकटीला सोडून जाणार ह्या विचारानेच तिच्या डोळ्यात पाणी आले होते...
" हो सर आपण लगेच निघतात ..."
शेखर डी . एस . पी . साहेबांना हॉल मध्ये थोडा वेळ बसायला सांगतो. आणि बेड रूम मध्ये आवरण्यासाठी येतो. नित्या ही त्याच्या पाठो पाठ येते ...
डोळे पाण्याने तुडुंब भरलेले , " शेखर जावंच लागेल का?"
" हो ...दुसरा ऑप्शन नाही काही ..."
" मी इथे एकटीच राहू "
" आता एकटी राहण्याची सवय करून घ्यावी लागेल . तू एका dashing पोलीस ऑफिसर बायको आहे . "
असं बोलत शेखर नित्या ला समजावत होता.
भरलेली बॅग घेऊन तो हॉल मध्ये आला . नित्या ही त्याच्या मागे आली .
" डोन्ट वरी नित्या ..लवकरच तुमच्या पती देवांना तुमच्या पाशी सुखरूप पोहोचत करेन ..प्रॉमिस "
डी. एस . पी.साहेब बोलले ...
नित्या ना त्यांच्या बोलण्यावर नाजूक स्मित करत मान हलवली ....
" चल शेखर " डी. एस.पी साहेब.....
" शेखर लवकर ये मी वाट बघतेय " नित्या रडवलेल्या स्वरांनी शेखर ला बाय बाय करते....
शेखर नजरेनेच होकार देतो .
क्रमशः
पुढील भाग लवकर...
No comments:
Post a Comment
Comments plz.