सीमा आणि विशाल ही लव्हस्टोरी आहे त्या लव्हबर्डची ..
जे कारण नसतांना एकमेकांपासून दूर झाले होते.
तिला भेटायला आज विशाल येणार होता , तो तिच्या आत्याचाच मुलगा होता . पण तिच्या घरच्यांना तो बिलकुल ही पसंद नव्हता. तसा मनाने खूप चांगला होता . पण खूप दारू प्यायचा . त्याची पहिली gf कोण असेल तर , ती त्याची दारू ...आणि नंतरची सीमा त्याची जाण .....आज चक्क तीन वर्षानंतर तो त्याच्या जानला भेटणार होता ...
दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी आतूर झाले होते .
तीन वर्षानंतर ची जी ओढ असते , ती शब्दात थोडी ना सांगता येते ...
त्याच्या गाडीचा आवाज आला हिचे कान तृप्त झाले . घरात लुटपुट करणारी सीमा बाहेर कपडे धुण्यासाठी आली . त्याला बघताच ती भारावून गेली , पण स्माईल न देताच आत गेली . तीन वर्षानंतर त्याच्यासमोर जरा attitude दाखवू लागली . त्याला कळेना ही अशी का वागते ? " काल भेटायला ये , असं सांगायला कॉल केला आणि आज अशी attitude का दाखवते . "
तो ही मग सारखं सारखं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला . ती अजुनच भाव खाऊ लागली . तो अजूनच प्रेमाने मनवू लागला .
" ये आयटम ..एवढ्या काय भाव खातेस ..बोल की भेटायला बोलवलं आणि मग आता अशी का वागतेस .
त्याने तिच्या हाताला घट्ट विळखा घालत तिला थांबवलं .
" सोड रे , "
" का सोडू " ह्या नंतर जाऊन तिने त्याला एक घट्ट मिठी मारली . आणि त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून हमसून रडू लागली .
" ये वेडा , काय झालं ? का रडतेस ? " तो तिच्या डोळ्यातील पाणी पुसत तिला विचारू लागला ..
ती त्याच्या छातीवर आपल्या हाताने हलकेच मारत , " रडू नको तर काय करू ..गेल्या तीन वर्षांत तुला एकदाही माझी आठवण नाही का आली ? कधी माझी विचारपूस नाही का करावीशी वाटली ? "
" तुला वाटलं का असं काही ? माझे वडील गेले तेव्हा तुला माणुसकी म्हणून एक साधा कॉल ही नाही करावासा वाटला . "
तो जरा चिडून बोलला . ती निशब्द झाली त्याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हत . ती काहीच बोलली नाही . थोडा वेळ दोघेही शांत राहिले मग परत थोड्या वेळाने त्यानेच सुरुवात केली बोलायला ...
" संपवलं तू होत आपलं नातं मी तरी कधीच नाही ? "
" मग काय करणार रे तेव्हा माझ्या आई वडिलांना संशय येत होता. त्यामुळेच बंद केलं होतं. " ती मान खाली घालुन बोलत होती शब्द तोंडातून बाहेर निघत नव्हते .
" हो का ? आता परत संशय आला तर काय करायचं ग ?"
तो तिच्यावर जरा चिडतच बोलला .
ती त्याच्याकडे भावनाशून्य होऊन बघत होती , आणि त्याला खूपच प्रामाणिकपणे सांगत होती .
" आता काहीही झालं तरी वेगळं व्हायचं नाही . तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही . प्लीज मला इथून घेऊन चल , मला लग्न करायचं तुझ्याशी ...मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय ..."
तो तिला सावरत तिची समजूत काढत , " सीमा मला ही लग्न करायचं आहे तुझ्याशी , तू जर मामाची मुलगी नसती ना , तर मी खरचं तुला पळवून नेलं असतं . पण मामाची मान खाली जाईल असं काही करायचं नाही ग मला ..तू प्लीज समजून घे . "
ती निशब्द होऊन , " काय समजून घेऊ तुला ? तू मला समजून घे , यार मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय ...तू मला प्रॉमिस कर आता आपण वेगळं होणार नाही ."
" करतो मी तुला प्रॉमिस आता आपण काहीही झालं तरी वेगळं होणार नाही . पण तू शांत हो . "
ते दोघेही शांत होतात आणि आपले भूतकाळातील गोड क्षण आठवतात . त्यांचं ते रोज चोरुन भेटणं , कॉलेज मध्ये जातो सांगून बाहेर फिरायला जाणं . हातावर काढलेले एकमेकांच्या नावाचं गोंदण सारच त्यांना आठवू लागल ...
त्यांच्या गप्पा खूपच रंगल्या होत्या तेवढ्यात सिमाच्या आईने आवाज दिला ..
" सीमा यांना जायचं आहे जेवणाचे ताट तयार कर . "
" हो आई " असं म्हणत ती घरात जाते .
जेवण वैगरे झाल्यानंतर ते जायला निघतात . तेव्हा सीमा त्याला डोळ्यांनीच खुणवत होती ..नको ना जाऊ प्लीज थांब ना .. तो ही डोळ्यांनेच इशारा करत होता . स्वारी जावं लागेल ....तेवढ्यात त्याची आई आली आणि तो बाईक वर बसून निघून गेला . तो खूप दूरवर जाईपर्यंत ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडेच बघत होता ...
क्रमशः
जाईल का ही लव्ह स्टोरी बघुया पुढच्या भागात ....
No comments:
Post a Comment
Comments plz.