नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 16, 2021

प्रीत ही नव्याने जागवू नकोस ....

लयास गेलेली , प्रीत ही पुन्हा जागवू नकोस ,
सुखी आयुष्य माझे तू असे हिरावून घेऊ नकोस ...

तुझ्या साठी आता नाही मन तळमळत ,
कसं रे तुला नाही कळत ....

तुझी माझी प्रीत  मी पूर्ण पने विसरले ,
तुझ्या आठवणीत रडण्याचे दिवस ही सरले ...
आयुष्याला मी माझ्या नवीन वळण दिले ...

त्याच्याकडे बघत ती पाणावलेल्या डोळ्यांत त्याच्या , त्यांच्याप्रती  परकेपणा असणारे शब्द रेखाटत होती . आज ती त्याला पूर्ण पने विसरून गेली होती , तिच्याच आयुष्यात ती हरवून गेली होती . स्वप्न सुखी आयुष्याचे जपताना त्याला विसरून जाणेच योग्य , ती कळून 
चुकली होती . त्याच्याबद्दल तिच्या मनात ना प्रेम होतं , ना काळजी होती , ना तिरस्कार होता ...होता तो फक्त परकेपणा ...... 

तिच्या मनात आपल्याबद्दल एवढा तिरस्कार का ? हा प्रश्न त्याला सतत सतावत होता ...तो जरा भित भित तिला काहीतरी विचारत होता ....

" कशी आहेस ? "

" कशी असणार एकदम मस्त , माझ्या पर्सनल आयुष्यात हॅपी अँड फ्री ..."   ती जराशी चिडून चं  बोलली ...

तो तिच्या उत्तरावर फक्त हसून खुश झाला . त्याला अस निरुत्तर बघून न राहून तिनेच प्रश्न. केला ...

" बायद वे , आपण कसे आहात ..." ती फारच परकेपणा ने बोलत होती . 

" मी पण मस्त " त्याला तिचा परकेपणा नकोसा वाटत होता . उगाच आलो आपण इथे साध्य काहीचं होणार नाही . माहीत असून सुधा इथे येण्याची खूप मोठी चूक केली . 

दोघेही जरा वेळ शांत झाले ..एकमेकांशी काहीचं बोलले नाही . पण अशी शांतता ही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती . 
मग बोलण सुरू झालं . सुरुवात तिनेच केली ....

" मग काय म्हणत आहे ...तुमची पहिली gf ..."
ति आता त्यां ला मनापासून torcher करत होती ...

" ये , प्लीज अशी नको ना बोलू ...किती दिवसानंतर भेटलो आपण , प्लीज जरा चांगलं बोलूया त ना .. "
तो नमव लेल्या स्वरात तिच्याशी बोलत होता . 

" का त्रास होतो का ? तिच्याबद्दल बोलले तर , तिच्यासाठीच तर तू मला सोडलं स ना , मग तिच्याबद्दल बोलले तर एवढा त्रास का ? " ती खूपच तिरकसपने बोलत होती...

" तू असच बोलणार आहेस का ? तुला मला समजून घ्यायचं चं नाही का ? एवढा वाईट आहे का मी ..." 
तो खूपच समजूतदार पने बोलत होता ...

" तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही माझी , समजून घेण्याचा प्रश्नच नाही ...कोण लागते मी तुझी ? काय संबंध तुझा आणि माझा ...? " ती खूपच चिडलेली होती . 

" मी तुझा राग समजू शकतो .. तुझा राग तुझ्या दृष्टीने बरोबर आहे . " तो दोषी असल्यामुळे त्याला नमत घेणं गरजेचं होतं ....

" समजू शकतोस ना मग का ? मला असा त्रास देतोस जाऊ दे मला ..बोलण्याची इच्छा नाही तुझ्याशी ..."
तिच्या बोलण्यात त्याला बिलकुल ही आपलेपणा जाणवत नव्हता ..."

" मला एकही संधी देणार नाही का ? मी आता पूर्णपणे बदललो आहे . माझ्यात तुला जे बदल अपेक्षित होते . ते पूर्ण बदल मी स्वतःमध्ये केले . तू मला फक्त एक संधी दे , मला एकदाचं समजून घे ..." 
     तो आज पूर्ण प्रामाणिकपणे बोलत होता , पण त्याच्या प्रामाणिक तेवर तिचा तीळ भरही विश्वास नव्हता . 

" तू दिली होतीस का , मला संधी ? " ती खूपच चिडून बोलली , तिच्या ह्या प्रश्नावर तो निशब्द झाला ...काहीचं नाही बोलू शकला ...न राहून गेल्या तीन वर्षांपासून जे मनात , होत ती आज सगळ बोलून मोकळं होणार होती .

" मी जेव्हा तुझ्यासमोर प्रेमाची भीक मागत होते , तेव्हा तुला तुझी जिवाभावाची दारू प्रिय होती. तू तिच्यासाठी मला सोडलं ..हे कसं रे मी विसरू ? नंतर मी किती वाईट दिवस काढले ह्याची कल्पना तरी आहे का तुला ? खूप वाईट परिस्तिथी तून मी स्वतःला सावरल आहे . परत त्या परिस्तिथी चा अनुभव घेण्याची इच्छा नाही . मी तुला पूर्ण पने विसरून गेली आहे . तू ही मला पूर्ण पने विसरून मला तुझ्याकडून कुठल्याच अपेक्षा नाही. आणि तुला ही नसाव्यात कारण , तुझ्या कुठल्याच अपेक्षा आता पूर्ण होणार नाही ... 

निद्रस्त झालेली प्रीत कुठल्याच परिस्थितीत नव्याने जागणार नाही ...लक्षात असू देत , मनात कोरून ठेव कायमचं कारण माझी स्वप्न आता खूप वेगळी आहे. त्या स्वप्नामध्ये तुला कुठेच स्थान नाही ..."

ती असं बोलून त्याची बाजू न समजून घेताच तिथून निघून गेली , त्यांनीही समजून घेतलं ही प्रीत पुन्हा नव्याने जन्मनार नाही . त्यानेही मनात हेच कोरून ठेवल ..

ही प्रीत पुन्हा नव्याने जागवू नकोस ....
भातुकलीतील तुझ्या बाहूलीच सुंदर आयुष्य तू हिरावून घेऊ नकोस ...
तिच्या आयुष्यात पुन्हा कधी नव्याने परतू नकोस ..

ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे...कुठल्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ...




1 comment:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...