चर्चा करण्यात आता काही रस नाही ,
जे काही झालं त्यात माझा दोष नाही ....
तू ही बोललास दोन शब्द जास्त ,
मी ही बोलले दोन शब्द जास्त ...
चूक दोघांचीही होती , मान्य कर बिनधास्त ...
नको एवढं ताणून धरू ,
विभक्त होण्याचा घाई घाईत निर्णय घेऊ ..
मी काही सरणावर पेटलेल प्रेत नाही ,
की मला भाव भावना नाहीत ...
मलाही मन आहे ,
तू ते कधी पाहिलीस नाही ,
मलाही राग येतो ,
तू कधी मनवलस नाही ,
तुझ्या परके पणाच वागणं सतत खटकतं ,
तू कधी आपले पना दिलास नाही ....
ह्यात माझी काहीचं चूक नाही ,
चर्चा करण्यात मला रस नाही ....
दुर्गा मते ...
©®
अतिशय भावस्पर्शी रचना 👌👌👌
ReplyDelete