उत्तर रातीने पहाटेला बोलावणे धाडले ,
उत्तर रातीने लावला मला लळा ,
अनुभवायला शिकवली पहाटेची कला ,
सारं जग सुन्न असतं ,
अन् पहाटेच आगमन होतं ,
पशु - पक्षांशी , वृक्ष - वेलींशी तिचं नातं जुळत ,
ह्या साऱ्यांच्या सहवासाने पहाटेच येणं फुलत ,
हे सारे समीकरण मला आवडते ,
उत्तर रातीच मन पहाटेला बोलावते ,
पहाट झाली फुलांचे सुगंध खुणावते ,
फुलांच्या साथीला पक्षी हे कुजबुजतते ,
पहाटेच कोकीळीची मधुर वाणी ऐकू येते ,
प्राजक्ताचे फुल अंगणात सडा टाकते ,
घरातील लक्ष्मी केसांत अबोलीचा गजरा माळते ,
अशा मोहक वातावरणाला उत्तररात ही गोंदते ...
दुर्गा मते ....
खूप सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना दुर्गा
ReplyDeleteखुपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteवा..... नित्या प्रसन्न पहाट झाली...कुपाच छान....👍👌✍️🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteखूप सुंदर ����
ReplyDeleteखुपच छान लिहीलयस 👌🏼👌🏼🌟🌟🌟🌟
ReplyDeleteअप्रतिम..रचना👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌👌👌🌿👌👌👌👌🌿👌👌👌👌🌿👌👌👌🌿🌿🌿👌🌿🌿🌿🌿👌
ReplyDelete