एक गोड परी नेहमी माझ्या स्वप्नात यायची ...
गोड गोड बोलायची , माझ्याशी खूप खेळायची ..
मला हसवायची , माझ्याशी एकरूप व्हायची ..
माझ्यासाठी कविता ही करायची ...
कधीतरी माझ्या मिठीत येऊन खूप रडायची .
तिचं दुःख जरासं हलकं करायची...
आई आई म्हणत घरभर फिरायची ..
हळुवार माझ्या गालावर किस करून जायची ..
वेड लावून अचानक घराबाहेर पडायची ...
घराबाहेर पडल्या नंतरही पुन्हा एकदा वळून बघायची ..
ती नजरेआड झाल्यानंतरही स्वर कानी यायचे ...
आई मी येतेय ग ! कसे वाटले हे गोड स्वप्न लेकीचे ..
स्वर हळवे ऐकताना ओठांवर हसू फुलायचे ..
स्वप्न पूर्ण होण्यास आशीर्वाद मिळाले मला बाप्पाचे...
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.