आकाशात एक तारा ,
मी ही शोधलाय ..
सुख दुःख व्यक्त करण्यासाठी ..
त्याला आपलसं करण्यासाठी ..
रडताना हळूच आसवे .
त्याच्याकडे सुपूर्त करण्यासाठी ..
आकाशात मी ही शोधलाय ..
एक तारा स्वतःसाठी ..
त्याच्याकडे बघताच ..
ताज्या झालेल्या आठवणी लोप पावतील ..
मला खळखळून हसवतीलं ..
आकाशात मी ही शोधलाय ..
एक तारा स्वतःसाठी ..
एखादं अवघड समीकरण सोडवण्यासाठी ..
अडकून पडले ना ...
लगेच त्याच्याकडे धावत जाऊन ..
समीकरण सोडवून घेईल ..
आणि ओरडून सांगेन मी त्याला ..
तुला शोधलं य मी स्वतःसाठी ..
आकाशात एक तारा शोधलाय मी स्वतःसाठी ..
एक तारा जपलाय मी मनाच्या समधानासाठी ..
दुर्गा मते
वावा सुंदर
ReplyDeleteखुप सुंदर
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDelete