नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 9, 2022

बायकोचे मनोगत ..

बायको प्रत्येक पुरुषाची हक्‍काची वस्तू  . तो तिच्यावर कुठल्या पद्घतीने अधिकार गाजवेन . हे कोणीच सांगू शकत नाही . मग बायकोने ही मजबुरी समजून नवरा म्हणेल ती पूर्व दिशा मान्य केलं . पण त्या पुरुषाने विचार केलाय का कधी आपण जसं वागतो . ते वागणं आपल्या बायकोला आवडत की नाही . कधी समजून घेतलीय का कुठल्या पुरुषाने आपल्या बायकोच्या मनाची व्यथा ..
तिची व्यथा थोडक्यात माझ्या दृष्टी कोनातून ..

जस नवऱ्याला वाटतं माझ्या बायकोने नेहमी मला समजून घ्यावं . तसचं तिला नसेल का वाटतं की माझ्या ही नवऱ्याने मला समजून घ्यावं .

आवडेल का कुठल्या पुरुषाला त्याची बायको भर गावात डिजे समोर नाचताना तिला पहायला . मग कुठल्या पुरुषाने विचार केलाय का कधी ? आपण एवढ्या जल्लोषात डिजे समोर नाचतोय हे आपल्या बायकोला आवडेल ना ?
केलाय का कोणी विचार ..

जसं नवऱ्याला वाटतं माझ्या बायकोने कुठलीही गोष्ट करण्याआधी माझी परमिशन घ्यावी . तसचं तिलाही वाटतंचं असेल ना , कधीतरी एखादी गोष्ट करताना माझ्या नवऱ्याने ही माझी परमिशन घ्यावी .

जस नवऱ्याला वाटतं ना की , माझ्या बायकोला बाहेर एक ही मित्र नसावा . तसचं तिलाही वाटतं असेलच ना की माझ्या नवऱ्याच्या ही बाहेर कोणी मैत्रिणी नसाव्या. 

जस ती तिचं माहेर ह्याच्यासाठी सोडून आली . मग तिची ही एक माफक अपेक्षा असेलच की . जेव्हा माझी ईशा होईल . माझ्या आई वडिलांना भेटायची . तेव्हा माझ्या नवऱ्याने मला त्यांना भेटायला न्यावं .

कधी विचार केलाय का कुठल्या बाईच्या मनाचा तिला काय वाटतंय.  ती आपल्या सावलीत मोकळा श्वास घेतेय ना की नाही . नसेल केला तर प्लीज एकदा हा विचार जरूर करून पहा .

Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...