नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 9, 2022

गणपती बाप्पा मोरया..

बाप्पा तुमचं आगमन झालं. 
आणि पुन्हा एकदा घराला घरपण आलं ..

तुमचे आशीर्वाद मिळाले ..
आनंदाचे मळे फुलले ..

आरती घेण्याचा पोरांचा उत्साह ..
सण साजरा केल्यागत वाटतो ..

गणेश स्थापनेने आयुष्य समृद्ध होत.

तुझ्या थोड्याशा भक्तीने खूप सुख मिळतं.  

तू बुद्धीची देवता ..मांगल्याची मूर्ती ..

तुला आज साष्टांग नमस्कार ..

आज तू जाणार म्हणून डोळे पाणावले ..

एक कोपरा भक्ती भावाने सजलेला रिकामा होणार .

म्हणून जरा हळहळले ...

बाप्पा आज तुझ्यासमोर एकच प्राथर्ना करते...

पुढच्या वर्षी लवकर ये ..रिकामा झालेला कोपरा ..

पुन्हा एकदा मला आनंदाने सजवू दे ..

दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...