अंगणी माझ्या बीज रुजले नव चैतन्याचे ...
गर्भात माझ्या बीज अंकुरले प्रितीचे ...
स्त्री जन्म सार्थकी झाला ...
देव भेटीला आला ..
एक अंश त्याचा सुखरूप ठेवण्यास ..
माझ्याकडे दिला ....
माझा सारा प्राण त्याच्यात अडकला ..
माझ्या आधी मी त्याचा विचार करू लागले ..
जणू त्याच्यासाठीच आजवर मी आयुष्य माझे जगले ..
त्याच्या पेक्षा मोलाचं काही वाटतंचं नाही ..
तोच आहे आज माझं सर्व काही ..
तोच दृष्टिकोन माझ्या जगण्याचा ...
संकल्प करते मी आज त्याच्या योग्य संगोपणाचा ..
थॅन्क्स गॉड तू तुझा एक अंश मला दिला ..
माझा स्त्री जन्म खऱ्या अर्थाने सार्थकी झाला ..
Written by - Durga mate
अभिनंदन अभिनंदन
ReplyDeleteखूपच छान
जबरदस्त 🥳🥳🥳.... खूपच सुंदर काव्यरचना 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete