देवा मी अस काय पाप केलं ...
की तू मला आजवर दुःखचं दिलं ..
नको होती मला कुनाची साथ ..
केली असती मी माझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात .
देवा तू का मला ?
खोट्या प्रेमाचे भास दिले ..
का ह्या वेड्या मनाने ही ,
सुखी आयुष्याचे स्वप्न पाहिले ...
दुःखाची ओंजळ रिकामी होणार नव्हती .
तर का सुखाची ओंजळ दाखवली ..
का देवा तू गरज असतानाच ,
माझ्याकडे पाठ फिरवली ...
तुझ्या साक्षीने चं मी खूप जणांना जवळ केले ..
तुलाच माहीत त्यांनी मला कसे त्यांचे ..
रंग रूप दाखवले ..
देवा आज मनापासून सांगते .
आता कुठल्याही मैफिलीत सामील व्हावं वाटतं नाही .
दुःख ही माझं कोणापुढे ओकावस वाटतं नाही .
फक्त मनातल्या मनात धाबावस वाटतं.
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.