नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 11, 2022

मी खूप प्रेम करते ..

मी प्रेम करते स्वतःवर ..
स्वतः पेक्षा जास्त माझ्या कलेवर ..
माझ्यातील चांगल्या वाईट गुणांवर ..

हसते , खेळते . रुसते ..
आनंदाचे गीत गाते ...
भावनांना शब्दांत उतरवते ..


स्वतःच्याच विश्वात हरवून जाते ..
सुखी आयुष्याचे सुंदर स्वप्न गुंफिते. .
मेहनतीने त्या स्वप्नांना सुंदर रित्या रंगविते ..

सावलीला म्हणते माझ्या ...
तू नेहमी सोबत रहा ..
तुझ्यामुळे अस्तित्व टिकून आहे माझं ..
तुझी गरज आहे शेवटच्या श्वासापर्यंत ....

मी खूप प्रेम करते ..
स्वतःवर .माझ्या कलेवर ..
आणि माझ्या अस्तित्वावर ..

1 comment:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...