अनोळखी असूनही
अनोळखी असूनही ते त्यांची कॉमेंट मेंट किती सिरीयसली निभावतात ..मला तर खूप अप्रूप वाटतं त्यांचं ....
प्रश्न पडला असेल ना कोणाचं ..तर मला अप्रूप वाटतं . अरेंज मॅरेज करणाऱ्याच ..
ना कधी एकमेकांना पाहिलेलं असतं. ना एकमेकांबद्दल काही माहीत असतं . तरीही एकमेकांसोबत सप्तपदी चालण्याच धाडस ते करतात .. जवळच्या मित्र मैत्रिणी ला ही आपण सहज वचन नाही देऊ शकत ...एवढ्या सहज वचन आपण त्या अनोळखी व्यक्तीला देऊन बसतो.
आणि त्याच अनोळखी व्यक्ती सोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो ...
खरच खूप छान आहे ही प्रथा ...
अरेंज मॅरेज एक सुखद अनुभव ...हवा हवासा वाटणारा .
मला ना लग्ना अगोदर लव्ह मॅरेज करण्याची खूप इच्छा होती . पण नेमकं नशीब खराब ..लव्ह झालं आणि मॅरेज अर्धवटच राहील 😝😝😝
पण लग्ना नंतर खर सांगू कळून चुकलं लव्ह मॅरेज पेक्षा कित्येक पटीत अरेंज मॅरेज छान असतं ....
अनेक जण म्हणतात लव्ह मॅरेज टिकत नाही . पण मी त्याला सहमत नाही .
खर प्रेम असेल तर ते शेवटच्या श्वासापर्यंत टिकतं ..मग ते लग्न बंधनात अडकलेलं असो नसो . प्रेम महत्वाचं ..
खर म्हणजे प्रेम ही भावनाच किती सुंदर आहे ...कोण असतो तो आपला ..ज्याच्यासाठी आपण आपला जीव ही गहाण ठेवायला तयार असतो ...
सुरुवातीला अनोळखीच असतो ना तो ..ज्याच्यावर आपण जीव जडलेला असतो ...किंवा जडत असतो .
अनोळखी व्यक्ती जेव्हा सहवासात येतो . तेव्हा atomatic त्याच्याशी एक बॉण्ड तयार होतो. मग तो अनोळखीच व्यक्ती कधी ओलखी चा होऊन आवडीचा होतो कळतं ही नाही ....
प्रेमात तरी रिस्क असते . आवडीच्या व्यक्ती सोबत ही काही कारणाने माणूस नाराज होऊन ब्रेक अप करतो .पण अरेंज मॅरेज मध्ये अस काहीही नसतं ..
सहवासाने प्रेम होतं ....
त्याच्या तिला किंवा तिच्या त्याला काही गोष्टी बद्दल तक्रार असली तरी ती तक्रार ओठांवर न येऊ देता .. मनातल्या मनातच दाबून तडजोड स्विकारल्या जाती ..सप्त पदी चालताना केलेली कमिटमेंट सिरीयसली निभावली जाती ....
खरच अरेंज मॅरेज चा प्रवास खूप सुरेख असतो...
अनोळखी तून ओळखीचा प्रवास ..प्रेम त्याग आणि तडजोड ...एक मेकांना समजून घेत ..आयुष्याचा प्रवास पुढे तसाच चालू ठेवणं खरच खूप अवघड असतं. . पण ते सगळं सहज सोप होऊन जातं अरेंज मॅरेज मध्ये .....
अरेंज मॅरेज करणारे सगळे अनोळखी असूनही ओळखीचे होऊन आयुष्यभर कमिटमेंट निभावतात ...
अनोळखी असूनही ......खरच खूप छान अनुभूती असते ...
👌 best and best.....!
ReplyDelete