संघर्ष ही माणसाची हक्काची लढाई आहे ...आणि प्रत्येकाने लढायलाच हवी ..... वादळात चालतांना मनात कसलीच भीती नसावी ...कमजोर कमकुवत करणाऱ्या काटेरी वाटेवर विश्वासाची फुले आपणच लावावी ..
काळया कुट्ट अंधारात रडत बसून राहण काहीचं फायद्याचं नाही ...त्या अंधारातून बाहेर पडायचं असेल तर हिमतीने प्रकाशाचा शोध घेणं खूप गरजेचं आहे ..
पाचीच्या दिवशी सट वाईने काय नशीब लिहून ठेवलं माझ ..अस म्हणत नशिबाला दोष देउन तिथल्या तिथेच चाचपडत राहण म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे .
परिस्थिती कितीही वाईट असू ..आपण हिम्मत हारू द्यायची नाही .. कारण जो हिमंत हारून सहज सार गिव अप करतो ..माझ्या नजरेत तो माणूस च नाही ..असच कोणीतरी आहे...
" जन्माला आला हेला पाणी वाहू वाहू गेला "
हीच उपमा मी त्याला देईल ...
आयुष्य आहे चार क्षणाचचं ...
इथे संघरश तर करावाच लागेल ...
तेव्हा कुठे ह्या मतलबी दुनियेत आपला निभाव लागेल...
ही लढाई परायाची नाही हे ..
ही लढाई तर स्वतःची च आहे ....
हीच ती खरी वेळ असते ..
स्वतःला सिध्द करण्याची ...
आपलं कर्तव्य पार पाडण्याची ...
ऐकलयं मी जेव्हा आपल्यावर चांगली वेळ असते ..तेव्हा आपल्या सुखात सारे साथीदार होतात ..पण नियती आपली खेळी बदलते ... जरास कुठे लॉस झाला की लगेच आपलीच माणसं आपल्या पासून दूर जाण्याचे रस्ते शोधतात ..आणि आपण बऱ्याचदा एकटे पडतो ..
जे आपले असतात तेचं कठीण परस्थितीत आपल्या सोबत असतात ...बदललेली परिस्थिती नकळत माणसाला खूप काही शिकवून जाते ..... आयुष्यभराचा अनुभव देऊन जाते ... सघंर्ष करायला शिकवते ..संकटावर मात करायला शिकवते . आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला शिकवते .....
त्यामुळे वाईट वेळ ही आयुष्यात येणं गरजेचं असतं .. तिचं वाईट वेळ आपल्या ला परफेक्ट करत असते ..आणि संघर्षावर मात करायला शिकवत असते ....
Good morning all of you dear readers 😊☕☕☕
No comments:
Post a Comment
Comments plz.