जे बोलतो ते घडत ..
असं कुठ असत का ?
मनात जे असत...
ते कधी नशिबी रूजत का ?
मनी वसे ते स्वप्नी दिसे. ही फक्त म्हण आहे. मनात जे असतं ते स्वप्नात कधीतरी च दिसेल आणि सत्यात उतरन तर फार दूरची गोष्ट आहे ...
उलट जे ठरवतो ..त्याच्या सारं मनाविरुध्द च गोष्टी ठरतात ..त्यामुळे ठरवून काम न केलेलीच बरी असतात. .
जी काम आपण ठरवून करतो . त्यापेक्षा जी काम आपण ठरवून करत नाही.... ती काम किती तरी पटीने चांगली होतं असतात ...विश्वास नसेल तर अनुभव घेऊन पहा .
लोकांनी कसं असावं तर मी सांगेन ऑन द स्पॉट असावं ..
जसं एखादा व्यक्ती मध्येचं उठून ई श्चा झाली म्हणून ऑन द स्पॉट भाषण ठोकतो आणि नेमकं तेच भाषण अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ठरतं ...अगदी तसच लोकांनी ऑन स्पॉट वागणं ठेवलं ना ..तर एक आदर्श व्यक्ती महत्त्व तयार व्हायला नक्कीच मदत होऊ शकते .....
आपण कितीही प्रामाणिक असलो ..अगदी जेव्हा गरज असेल समोरच्याला तेव्हा पटकन हातातील काम सोडून धावत जातं असू त्यांच्या मदतीला ..तरीही आपण त्यांच्या मनाचा ठाव घ्यायला कुठेतरी कमी च पडू ...नेहमी मदतीला धावून जाणारा एखादं वेळेस नाही जाऊ शकला की लगेच त्याची निंदा केली जाते .....आणि गरज नसल्यासारखं बोलण ही सुरू होऊन जातं . त्यापेक्षा माणसाने जशाच तस असावं असं मला मनापासून वाटतं ...
उगाच मी एक आदर्श व्यक्ती महत्त्व आहे ...अस दाखवण्यासाठी नको तितका चांगुल पना दाखवण्याची गरज नाही ....आपण फक्त आपल्या नजरेत चांगलं राहून एक आदर्श व्यक्ती महत्त्व ठरू शकतो ..
आपण कधी कोणाला फसवतोय का ? किंवा फसवल आहे का ? किंवा कोणी आपल्या hurt झालाय का ? किंवा कधी हयाआधी कोणाला hurt केलय का ? उत्तर जर नाही येत असेल तर तुम्ही नक्कीच एक आदर्श व्यक्ती महत्त्व आहात ......
वागण्याची पण एक लिमिट असते ...
समोरचा आपला गैरफायदा घेऊन मोकळा होईल ..
एवढं ही काही चांगल वागण्याची गरज नसते ...
Written by - durga mate
अप्रतिम सुंदर लिहिलय
ReplyDelete