पिकली पाने गळून पडली .......
संसारात गुंतून पडले , वर्ष पुढे सरली ...
प्रेम मागे राहिले....
तुझ्या सवे जगण्याचे स्वप्न पाहिलेले..
ही ह्या मनाने परतून लावले...
मात्र तुझ्या आठवणीत आज ही गुंतून राहिले...
कॉन्टॅक्ट बंद होऊन किती दिवस सरले...
तरीही वाट पाहण्याचे हर्ष मनी कोरले..
तुझी वाट पाहणं म्हणजे ,
निव्वळ वेडेपणा .माहीत मला ..
तरीही त्या वेडेपणाच सुख उपभोगायला ,
आवडतं मला...
सांगते तुला ...
वेड्या आशेवर , कोणत्या माहीत नाही.
एका नव्या वळणावर..
तू नव्याने नक्की भेटशील...
या आशेवरच ,
मी अजुनही आहे तुझ्यातच रमलेली ...
No comments:
Post a Comment
Comments plz.