धुक्यात हरवलेले तुझे माझे भान .
स्वप्न आकाशी विहरलेला तू ,
सोबत घेऊन मला ...
सांजवेळी सुर्य ढळता ,
डोळ्यांची पापणी मिठता ,
तू मला मिठीत घेता ,
सुवर्ण क्षण ते भासे मला ...
महाबळेश्वर ची ती थंडी हवा ,
त्यात सुरू झालेला आपल्या नात्याचा प्रवास नवा ..
ते क्षण आजही आठवतात ,
गेलेले ते दिवस नव्याने परतून यावे ,
तू माझ्याशी मी तुझ्याशी ,
पुन्हा एकदा एकरूप व्हावे ...
अप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDelete