नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 17, 2021

किती ह्या नात्याला सावरू..

किती ह्या नात्याला सावरू ,
तुला समजून घेता घेता किती हे मन आवरू ...

तुझ्यासाठी खूप काही करते ,
तरीही कुठेतरी कमीच पडते ...

तुला कधीही दुखवायचं नाही ,
आयुष्य सरलं तरी गमवायच नाही ..
मनात हेच पेरलंय ..
तुझ्यासाठी रे आयुष्य माझं मी बांधलंय ..

तुझी काळजी करण मला भावत ,
तुझ मला छळन खूपच आवडत ...
  धावणार मन हे कुठेतरी थांबत ...
तुझ्यापाशी येऊनच तर ते विसावत ...

सांग ना सख्या...
किती ह्या नात्याला सावरू ,
तुला समजून घेता घेता किती हे मन आवरू ....




5 comments:

  1. शब्द रचना अप्रतिम आहे.

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  3. Khup Sundar rachna 👌 👌

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...